जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्याला प्राधान्य-लढ्ढा (व्हिडिओ)

जळगाव, सचिन गोसावी माजी महापौर तथा जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन महापौर जयश्री सुनील महाजन यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. यावेळी नितीन लढ्ढा यांनी जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्याला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.  

 

याप्रसंगी विरोधी पक्ष नेते सुनील महाजन, भाजपा नगसेवक नगरसेवक कैलास सोनवणे, भगत बालाणी,   शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, शिवसेना महिला आघाडीच्या शोभा चौधरी, नगरसेविका ज्योती चव्हाण, माजी उपमहापौर करीम सालार, राष्ट्रवादी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, राजू आडवाणी आदी सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.     नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी संपर्क कार्यालायाबाब्त भूमिका स्पष्ट करतांना सांगितले. जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्याला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.   मनपाचा पुढील २ वर्षाचा कालावधी मोठा आव्हानात्मक आहे. रस्त्यांची परिस्थिती मोठी खराब आहे. निधीची कमतरता होती, ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी ६१ कोटींचा निधी मिळाला आहे. १०० कोटींच्या निधीचे नियोजन करण्यसाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या समावेत भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. दोन वर्षात शहराच्या समस्या कमी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. आगामी विधान सभेची निवडणूक लढविण्याची ही तयारी आहे का ? असा प्रश्न विचारला असता त्यांनी या प्रश्नाल थेट उत्तर न देता  आमदारकीचा विषय तीन वर्षांनी येणार असून आमदारकीसाठी अनेक इच्छुक असल्याचे सागितले. शहरातील जनता सुज्ञ असून योग्य व्यक्तीला निवडून देत अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

 

 

भाग १

भाग २

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!