जखमी ट्रक क्लिनरचा उपचारादरम्यान मृत्यू

शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जखमी अवस्थेत दाखल केलेल्या ट्रक क्लिनरचा रविवारी ७ मे रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अब्दुल गफ्फार अब्दुल सत्तार (वय-४४) रा. शांती नगर, निजामाबाद, आंध्रप्रदेश असे मृत झालेल्या ट्रक क्लिनरचे नाव आहे.

 

शनीपेठ पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,  अब्दुल गफ्फार हा ट्रक क्लिनर असून मिळेल ते ट्रकवर जावून सामान किंवा कंपनीचा माल पोहचविण्याचे काम करत होता. २ मे रोजी हैदराबाद येथून बिडीने भरलेला ट्रक हा राजस्थान अजमेर येथे जाण्यासाठी निघाला होता. या ट्रकवर चालक अब्दुल फय्युब रा. निजामाबाद आणि क्लिनर म्हणून अब्दुल गफ्फार हा देखील होती. शनिवारी ६ मे रोजी हा ट्रक मुक्ताईनगर तालुक्याच्या सिमेवर पोहचला. या सीमेवर मेवाड छाबा म्हणून हॉटेलवर जेवणासाठी ट्रक थांबविला होता. त्यावेळी दोघेजण जेवणासाठी गेले. यावेळी अब्दुल गफ्फारचे जेवण झाल्यावर तो ट्रकवर चढला. अचानक त्याचा तोल जावून खाली पडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचारा सुरू असतांना रविवारी ७ मे रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content