चौधरी चरण सिंह विद्यापिठाच्या अभ्यासक्रमात आता बाबा रामदेव , योगी आदित्यनाथ

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ।  अ‍ॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे” म्हणणाऱ्या बाबा रामदेव यांना आता योगातील तत्वज्ञ मानून    व योगी आदित्यनाथ यांच्या  पुस्तकाचा देखील आता अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.

 

मेरठच्या चौधरी चरण सिंह विद्यापिठात आता विद्यार्थ्यी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ आणि रामदेब बाबा यांच्या विषयी अभ्यास करणार आहेत. विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाने हा  निर्णय घेतला आहे. या दोघांव्यतिरिक्त बशीर बद्र, कुवर बैचेन, जग्गी वासुदेव यांचाही समावेश आहे.

 

विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाने नविन अभ्यासक्रमाला मान्यता दिली आहे. नविन अभ्यासक्रमात योगी आदित्यनाथ यांनी लिहिलेल्या हठयोग या पुस्तकाबद्दल शिकवण्यात येणार आहे. या पुस्तकात योगी आदित्यनाय यांनी हठयोगाविषयी माहिती दिली आहे. योगींच्या पुस्तकाचे प्रकाशन गोरखनाथ ट्रस्टने केलं आहे. योगी यांचे विचार विद्यार्थ्यांना वेगळा रस्ता दाखवतील असं अभ्यास मंडळाचे म्हणणे आहे.

 

 

अभ्यास मंडळाने रामदेव यांच्या योगाभ्यास आणि योग चिकित्सा रहस्य या पुस्तकांचा देखील अभ्यासक्रमात समावेश केला आहे. या पुस्तकाच्या कलाशाखेच्या अभ्यासक्रमात समावेश केला आहे. तत्वज्ञानच्या विषयात आता प्रॅक्टिकल आणि थेअरी अभ्यास असणार आहे.

 

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२१- २२ नुसार अभ्यासक्रम मंडळाच्या झालेल्या बैठकीत नविन अभ्यासावर शिक्कामोर्तब केलं आहे. आपल्या येणाऱ्या पिढीला भारतातील सर्व क्षेत्रातील समृद्ध वारश्याविषयी माहिती यातून माहिती मिळणार आहे. याचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे अशी माहिती डॉ. डीएन. सिंह यांनी दिली.

 

विद्यापीठाच्या विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमात आर्यभट्ट, भास्कराचार्य, लीलावती,रामनुज,माधवाचार्य, स्वामी कृष्णतीर्थ यांच्या योगदानाविषयी माहिती देण्यात आली आहे. भौतिकशास्त्रात आर्यभटांचा समावेश करण्यात आला आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!