चौकाच्या नामकरणासाठी नगरपरिषदेला निवेदन

खरजई नाका परीसरातील नागरीकांची मागणी

शेअर करा !

 

 

 

चाळीसगाव : प्रतिनिधी । शहरातील खरजई नाका परीसरातील चौकाचे संताजी जगनाडे महाराज यांच्या नावे ‘श्री संताजी कॉर्नर’ असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी परीसरातील नागरीकांनी केली असून या मागणीचे निवेदन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांना देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की , चाळीसगाव शहराला संत विभूतींची परंपरा लाभली असून थोर संत तुकाराम महाराज आणि संत जगनाडे महाराजांचे गुरुशिष्याचे नाते सर्वश्रुत आहे. संत तुकाराम महाराजांची गाथा लिहिणारे संत संताजी जगनाडे महाराज यांचे कार्य समस्त समजासाठी नेहमीच आदर्शवत आहे.

यापूर्वी सन १९९८-९९ या कालावधीत तत्कालीन नगराध्यक्ष कै. अनिलदादा देशमुख, माजी नगराध्यक्ष कै. मधुकर चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत खरजई नाका परीसरातील चौकाचे ‘संताजी कॉर्नर’ या नावाने फलकाचे अनावरण करण्यात येवून नामकरण करण्यात आले होते. नागरीकांची मागणी लक्षात घेता चौकाचे संताजी जगनाडे महाराजांच्या नावे ‘श्री संताजी कॉर्नर’ असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी परीसरातील नागरीकांनी निवेदनाद्वारे केली आहे.

नगरसेवक सूर्यकांत ठाकूर, माजी नगरसेवक प्रदीप राजपूत, अनिल चौधरी (ठाकरे), अमोल चौधरी, स्वप्नील कोतकर, प्रकाश पाटील, योगेश चौधरी, सतीश चौधरी, चंद्रकांत महाजन, मनोज चौधरी आदी उपस्थित होते तर यशवंत चौधरी, संजय चौधरी, सुधीर चौधरी, वनेश खैरनार, प्रताप भोसले, दिपक सुर्यवंशी, सचिन देशमुख, उमेश आंधोळकर, गणेश चौधरी, प्रवीण चौधरी, चंद्रकांत चौधरी, निखिल देशमुख आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!