चोरीच्या १५ मोबाईलसह संशयिताला अटक !

तीन चोरटे फरार; जामनेर पोलीसांची धडक कारवाई

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील बसस्थानक परिसरातून एका संशयित आरोपीला १५ मोबाईलसह जामनेर पोलीसांनी अटक केली आहे. जामनेर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, जामनेर शहरांमध्ये अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या भागांमध्ये मोबाईल चोरीच्या तक्रारी येत होत्या. या संदर्भात जामनेर पोलिसांनी तपास सुरू केला होता. तपासातून पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी ११ जानेवारी रोजी जामनेर पोलीसांनी सापळा रचून बसस्थानक परिसरातून अकरम शाह मोहम्मद शहा (वय-१९ रा, बिस्मिल्ला नगर, जामनेर) याला अटक केली. त्याच्याकडून चोरीचे १ लाख २८ हजार रूपये किंमतीचे १५ मोबाईल हस्तगत केले आहे.

यांनी केली कारवाई
जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल जयत पगारे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील राठोड, निलेश घुगे, सोनूसिंग डोभाळ, तुषार पाटील, पांडुरंग पाटील, मुकेश आमोदकर, रमेश कुमावत यांनी केली.

पोलीस कॉन्स्टेबल सोनूसिंग डोहाळे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी जमील खान बुरान खान, समिर शहर अमीर शहा, अकरम शाह मोहम्मद शहा (वय-१९) तिघे रा, बिस्मिल्ला नगर, जामनेर आणि राजकुमार चंदनाणी रा. जामनेर या चौघांविरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्वरित तीन फरार आरोपींचा शोध घेणे सुरू आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content