जळगाव प्रतिनिधी । चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज अटक केली असून पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या प्रकरणात संशयित आरोपी मोहम्मद एजाज जलालद्दीन काझी वय-51 गुरनं 58/2017 रा. चेलीपुरा औरंगाबाद याच्या विरोधात भादवि 379, 34 गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून आरोपी फरार होता. आज पोलीस प्रशासनाच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक बापु रोहम यांनी पथक नेमून आरोपीला अटक करण्यासाठी औरंगाबाद येथे रवाना केले. औरंगाबाद येथील सीटी चौक पोलीस स्टेशनच्या परीसरातू मोहम्मद एजाज काझी याला अटक केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसांना पुढील कारवाईसाठी ताब्यात देण्यात आले आहे.