चोपडा रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी नितीन अहिरराव

शेअर करा !

 

चोपडा, प्रतिनिधी । पन्नास वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या शहरातील रोटरी क्लब ऑफ चोपडाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या (२०२०-२१) अध्यक्षपदी उद्योजक नितीन अहिरराव यांची तर मानद सचिवपदी अॅड. रुपेश पाटील यांची निवड झाली आहे.

store advt

सन २०१३ पासून नितीन अहिरराव रोटरीत सक्रीय असून विविध कमीटीवर चेअरमनपदी तसेच रोटरीच्या उपाध्यक्षपदी त्यांनी काम केले आहे. चोपड्यात मागील वर्षी झालेल्या रोटरी महोत्सवाचे यशस्वी आयोजन त्यांच्या चेअरमनशिपमध्ये घेण्यात आले होते. नक्षत्र ज्वेलर्सचे संचालक म्हणून ते उद्योग क्षेत्रात कार्यरत आहेत तर रुपेश पाटील ग्रीन ग्लोब बायोटेक्नॉलॉजी कंपनीचे संचालक असून ते चोपडा साखर कारखान्याचे माजी चेअरमन अॅड. घनश्‍याम निंबाजी पाटील यांचे सुपुत्र आहेत. तसेच त्यांनी क्लबमध्ये विविध कमिट्यांवर जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. नूतन अध्यक्ष नितीन अहिरराव यांनी कार्यकारिणीची घोषणा केली असून त्यात कोषाध्यक्ष – अर्पित अग्रवाल, उपाध्यक्ष – पंकज बोरोले, सार्जंट अॅट आर्मस – भालचंद्र पवार तर इतर विविध समित्यांचे चेअरमनपदी अशिष गुजराथी, संजीव गुजराथी, अविनाश पाटील, प्रसन्न गुजराथी, डॉ. नीता जैस्वाल, विलास एस. पाटील तर क्लब ट्रेनर म्हणून एम. डब्ल्यू. पाटील तसेच सल्लागार समितीमध्ये डॉ. शेखर वारके अॅड. अशोक जैन व इतर समित्यांमध्ये बाकी सदस्यांच्या समावेश आहे. नवीन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा १० जुलै रोजी ऑनलाईन होणार असल्याचे त्यांनी कळविले आहे.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!