चोपडा पालिवाल पंचायत अध्यक्षपदी प्रदीप पालिवाल

WhatsApp Image 2020 02 06 at 5.12.15 PM

चोपडा, प्रतिनिधी । पालीवाल पंचायतच्या नुकत्याच घेण्यात आलेल्या बैठकीत तीन वर्षासाठी नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावेळी सर्वानुमते अध्यक्षपदी प्रदीप निळकंठजी पालीवाल यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी नागेंद्र वामनरावजी पालीवाल आणि गिरीश गणेशचंद्रजी पालीवाल यांची निवड करण्यात आली.

पालीवाल समाजाच्या बैठकीचे प्रास्ताविक महाराष्ट्र पालिवाल परिषदेचे महामंत्री अनिलकुमार पालीवाल यांनी केले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पालीवाल परिषदेचे अध्यक्ष कांतिलालजी पालीवाल होते. यावेळी वर्षभरात घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमात संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत झालेल्या निर्णयानुसार नूतन सचिव म्हणून संदीप चंद्रकांतजी पालीवाल, सहसचिव राजेंद्र भालचंद्रजी पालीवाल तर कोषाध्यक्ष म्हणून डॉ. विशाल राजेंद्रजी पालीवाल यांची निवड करण्यात आली. . सदस्यपदी सोमचंद शिवलालजी पालीवाल, सुनील रमेशचंदजी पालीवाल, श्याम नारायणदासजी पालीवाल, संजय शिवदासजी पालीवाल, शामकांत देविदासजी पालीवाल, अभिषेक कैलासजी पालीवाल, सुरेंद्र नंदलालजी पालीवाल, सिद्धार्थ चंदुलालजी पालीवाल, अनिल भिकारीलालजी पालीवाल, मोनेश नारायणदासजी पालीवाल, महेश श्रीकृष्णजी पालीवाल आणि रवींद्र भालचंद्रजी पालीवाल यांची निवड जाहीर करण्यात आली. ही कार्यकारिणी पुढील तीन वर्षांसाठी असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले. या निवडीसाठी सूचक म्हणून विलास ओंकारलालजी पालीवाल तर अनुमोदक म्हणून अनिल द्वारकादासजी पालीवाल होते. ज्येष्ठ सदस्य नारायणदासजी पालीवाल, अशोकजी पालीवाल तसेच पालीवाल समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार नूतन अध्यक्ष प्रदीप पालिवाल यांनी मानले.

Protected Content