चोपडा, प्रतिनिधी । कृत्रिम खत टंचाई व बढया दराने विक्री यामुळे शेतकरी त्रस्त आहे. ही समस्या त्वरित संपावी म्हणून चोपडा शहर व तालुका काँग्रेसतर्फे तहसीलदार श्री. गावित यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कृत्रिम खत टंचाई विरूद्ध कृषी अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात येऊन परिस्थिती सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला.
काँग्रेसतर्फे निवेदन देतांना तालुका अध्यक्ष राजाराम बाबुराव पाटील, शहराध्यक्ष के. डी. चौधरी, महेमूदअली सय्यद शहर ऊपाधयक्ष काँग्रेस शेतकरी सेलचे शशिकांत शांताराम साळुंखे आदी उपस्थित होते. निवेदनावर मार्केट कमिटी माजी उपसभापती नंदकिशोर सांगोरे , सूत गिरणी संचालक राजेंद्र भास्करराव पाटील, शेख अ . हमीद वाहेद , कांतिलाल जगतराव सनेर, तालुका युवक अध्यक्ष किरण प्रतापराव सोनवणे, नरेंद्र छगन पाटील, कलींदर समशेर तडवी, फकिरा रामदास पाटील, जिजाबराव बळीराम पाटील, संजीव गुलाबराव सोनवणे, दिलीप युवराज पाटील, किरण गोविंदा बागुले , गणेश भगवान धनगर, सुनील सिताराम बागुले, वासुदेव साहेबराव बागुल, देवानंद धनसिंग शिंदे, रमेश डिगंबर पाटील, रमेश एकनाथ शिंदे, मधुकर विठ्ठल बाविस्कर, सोपान भरत पाटील,अॅड.संदेश जैन, अशोक साळुंखे, श्री.जैन, एनएसयूआय अध्यक्ष चेतन बाविस्कर, मा. नगरसेविका फातिमाताई आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदन देतांना राष्ट्रवादीचे गट नेते जिवन ओंकार चौधरी यांनी ऊपसथिती देऊन सहमती दर्शवली. निवेदन देतेवेळी तालुका कृषी अधिकारी श्री चौधरी हेही हजर झाले. तहसीलदार यांचे समक्ष कृत्रिम खत टंचाई व वाढत्या दराने शेतकऱ्यांची होणारी लूट याबाबत राजाराम पाटील, के. डी. चौधरी, शशिकांत साळुंखे व उपस्थित शेतकरी यांनी प्रश्न केले. कृषी अधिकारी समस्यांचा पाढा वाचू लागले तेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेराव करून अडचणी न सांगता त्वरीत शेतकऱ्यांना योग्य भावात मागणीनुसार खत उपलब्ध करून देण्याबाबत ठणकावून सांगितले. दोन दिवसात परिस्थिती न सुधारल्यास काँग्रेसच्या व शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनास तोंड द्यावे लागेल .यावेळी कृषी अधिकारी यांनी त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले.