भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील धन्वंतरी मंदिराजवळ रस्त्यावर पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातून सोन्याचे मंगळसूत्र जबरी हिसकावून चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सरला मुकेश ठाकूर (वय-३५) रा. सरस्वती नगर, नंदिनी प्लाझाजवळ, भुसावळ या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवार ५ डिसेंबर रोजी दुपारी अडीच वेळेच्या सुमारास सरला ठाकूर ह्या महिला शहरातील धन्वंतरी मंदिराजवळून पायी जात असताना त्यांच्या मागून अज्ञात चोरटा दुचाकीवर येऊन त्यांच्या गळ्यातील २० हजार रुपये किमतीची सोन्याचे मंगळसूत्र जबरी हिसकावून धुमस्टाईल पसार झाला. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन वाघमारे करीत आहे.