चैतन्य तांडा येथे विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचा सिलसिला सुरूच!

 

 

चाळीसगाव, प्रतिनिधी । कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तालुक्यात हाहाकार माजवला असताना विना मास्क फिरणाऱ्यांची  संख्या ही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर चैतन्य तांडा येथे पोलिसांच्या मदतीने एकूण चोवीस विना मास्क  फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.  हि कारवाई बायपास जवळील विराम लॉन्स समोर करण्यात आली.

कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेऊन तालुक्यातील चैतन्य तांडा ग्रामपंचायतीने विराम लॉन्स जवळील बायपासला विना मास्क  फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ग्रामीण पोलीसांच्या मदतीने हि कारवाई करण्यात आली. एकूण २४ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. प्रत्येकी शंभर रूपये प्रमाणे यावेळी दंड ठोठावण्यात आला. कारवाई दरम्यान विना मास्क  फिरणाऱ्यांना  ग्रामपंचायतीतर्फे मास्कचे वाटप करण्यात आले. या कारवाईत एकूण २४०० रुपये वसूली ग्रामपंचायतीला  प्राप्त झाली. हि कारवाई चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार करण्यात आली. कारवाई दरम्यान हवालदार युवराज नाईक, हवालदार  बडगुजर,  हवालदार दीपक नागरे, विकास सोसायटीचे माजी चेअरमन दिनकर राठोड व उपसरपंच आनंदा राठोड, ग्रामसेवक कैलास जाधव व राजेंद्र चव्हाण आदींनी केली.  दरम्यान मास्क वाटपाप्रसंगी राज्यात कडकडीत संचारबंदी पुकारण्यात आली आहे. त्यामुळे कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन करगाव विकास सोसायटीचे माजी चेअरमन दिनकर राठोड यांनी केले.

 

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.