चुंचाळ्यात शुक्रवारी गुरुशिष्य पुण्यतिथी अनोखा सोहळा

भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील चुंचाळे येथील गुरु रघुनाथ बाबा व शिष्य वासुदेव बाबा हे एकाच दिवशी वैशाख शुध्द बारसला समाधिस्थान झाले. या गुरु व शिष्य यांच्या पुण्यतिथी  सोहळ्याचे उद्या करण्यात आले आहे.

 

उद्या शुक्रवारी दि.१३ रोजी श्री समर्थ वासुदेव बाबा दरबार येथे गुरु व शिष्य यांचा पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री सुकनाथ बाबा हे श्री क्षेत्र काशी येथुन चुंचाळे येथे येथे त्यांनी अखंड बारा वर्ष तप केला म्हणून चुंचाळे हे गाव सुकनाथ बाबा यांची तपोभुमी म्हणून ओळखली जाते. तसेच त्यांचा मुलगा रघुनाथ बाबा यांचा जन्म याच भुमीत झाला म्हणून हे गाव त्यांची जन्मभुमी म्हणूनओळखली जाते. वासुदेव बाबा यांची कर्मभुमी या नावाने हे गाव प्रसिद्ध आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी चुंचाळे या पावन नगरीत महाराष्ट्रासह गुजरात,मध्यप्रदेश व परिसरातील गावामध्ये देखील यांचे शिष्यमंडळी आहे याच पिता पुत्राच्या एकाच मंदीरात समाधीचे स्थान वर्डी ता.चोपडा येथे आहे सुकनाथ बाबा यांनी १९३५ मध्ये तर रघुनाथ बाबा १९७९ मध्ये वर्डी ता.चोपडा या गावात समाधिस्थ झाले. त्यांचे शिष्य वासुदेव बाबा हे गुरु रघुनाथ बाबांना बरोबर १९८० मध्ये चुंचाळे येथे बालपण अवस्थेत घर शिरपुर सोडुन बाबाची आणि पुरातन असलेली समाधी यांची स्नान, पुजापाट, आरती करीत मंदिरात भक्ती केली व वासुदेव बाबांनी गावकरी आणि शिष्यमंडळीच्या सहकार्याने गावात मंदिर बांधण्यास प्रारंभ केला. आज हे येवढे मोठे भले मंदिर उभारले मंदिरात २१ किलो चांदीच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा सन २००० मध्ये करण्यात आली या मंदिराचा कळस ६१ फुट उंचीचा आहे.

असा साजरा होतो अनोखा सोहळा
वासुदेव बाबा हे नेहमी वैशाख शुध्द बारसला त्यांचे गुरु रघुनाथ बाबा यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम करत होते, तेव्हा ते भक्ताना सागायचे की मी समाधिस्त झाल्यावर सुद्धा माझ्या गुरुची पुण्यतिथी साजरी करीत जा. पंरतु, गावातील गावकरी व शिष्यगण तुम्ही जसे तुमच्या गुरुची पुण्यतिथी साजरी करतात तशिच आम्ही तुमचीही पुण्यतिथी साजरी करत जाऊ आपल्या गुरुची आपल्यानतरही पुण्यतिथी व्हावी म्हणूनच आपल्या गुरुच्या पुण्यतिथी दिवशीच वासुदेव बाबा समाधिस्थान झाले तर २००१ पासुन असा गुरु शिष्य पुण्यतिथीचा सोहळा होऊ लागला. या सोहळ्यासाठी मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक येथील भाविकांचा यात समावेश आहे

 

असा होईल विविध धार्मिक कार्यक्रम
पहाटे ५ वाजता मुर्ती व समाधी स्नान, ६ वाजता मारुती अभिषेक, दुपारी १२ वाजता महाआरती, सायंकाळी ७ वाजता आरती, सकाळी ८ ते रात्री पर्यंत आरतीवेळ सोडून भजन.भारुड सुरु राहतील. दुपारी १ ते रात्रीपर्यंत महाप्रसादाचे वाटप होईल. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री समर्थ वासुदेव बाबा भक्तगण व भंजनी मंडळ आणि गावकरी मंडळीने केले आहे.

 

भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

दरम्यान, समाधी  सोहळायात्रेच्या निमित्ताने भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघ यांच्यातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात परिसरातील रक्तदान करणाऱ्या दात्यांनी यात सहभाग घ्यावा असे आवाहन पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश चौधरी, विभागीय उपाध्यक्ष महेश पाटील, जिल्हा कार्यध्यक्ष आर. ई. पाटील, जिल्हा समन्वयक रणजीत भालेराव, सचिव शब्बीर खान, नितिन बडगुजर, मनोज नेवे, तालुका अध्यक्ष ए. टी. चौधरी, उपाध्यक्ष फिरोज तडवी, दिपक नेवे, विक्की वानखेडे यांनी केले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!