चिलगाव ग्रामपंचायत सरपंचपदी मनीषा बागुल यांची बिनविरोध निवड        

जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील चीलगाव येथील ग्रामस्थांनी गावाचा विकासासाठी दोघे पक्षातील पाच-पाच सदस्य घेऊन सरपंचपदी भारतीय जनता पार्टीच्या तालुका उपाध्यक्ष बापू बागुल यांच्या पत्नी मनीषा बागुल यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

तालुक्यातील चिलगाव ग्रामपंचायत वर भारतीय जनता पार्टीचा झेंडा लागला असून सरपंच पदी बिनविरोध झालेल्या मनीषा बापू बागुल व सदस्य प्रशांत ज्ञानेश्वर पाटील, मनोज जनार्दन सरोदे दिपाली मधुकर मानकर शितल संदीप चव्हाण यांचा सत्कार नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

चिलगाव ग्रामपंचायत विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांनी एकत्र आले असून त्यामध्ये राष्ट्रवादीचे बिनविरोध झालेले सदस्य संजय पाटील, रूमशाद उस्मान तडवी, मंगलाबाई उगले, रेखा पाटील, पंकज देवराम हे सदस्य बिनविरोध झाले आहे.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, नवल पाटील, यशवंत पाटील, उल्हास पाटील, सुधाकर माळी, बाळू धुमाळ, बाळू चव्हाण, बापू बागुल, सुभाष पाटील, सुपडू पाटील, सतीश फुवटे आधी उपस्थित होते.

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content