चिनावलमध्ये पाच तर खिरोद्यात एक कोरोना बाधीत रूग्ण

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । आज सकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये तालुक्यातील चिनावल येथे पाच तर खिरोदा येथे एक कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आला असून प्रशासनाने याला दुजोरा देत उपाययोजना सुरू केल्या आहेत.

store advt

आज सकाळी चिनावल येथे पाच कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. तेथील आरोग्य अधिकारी डॉ. विजया झोपे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान, प्रशासनाने संबंधीत रूग्णांच्या रहिवासाचा परिसर सील करण्यास प्रारंभ केला असून या भागात फवारणी करण्यात येणार आहे. दरम्यान, आजच्या पाच रूग्णांमुळे चिनावल येथील एकूण रूग्णांची संख्या ३२ इतकी झालेली आहे. यातील दोन रूग्णांना मृत्यू झाला असून १० जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर उर्वरित रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, तालुक्यातील खिरोदा येथे आज पहिला कोरोना बाधीत रूग्ण आढळून आला आहे. येथील ८३ वर्षाच्या महिलेस या विषाणूची बाधा झालेली आहे. आजवर खिरोदा येथे कोरोनाचा रूग्ण आढळून आला नव्हता. तथापि, आता येथे या विषाणूचा शिरकाव झाल्याचे दिसून आले आहे.

error: Content is protected !!