चित्र रंगवा स्पर्धेतील गुणवंतांना आ. किशोर पाटलांच्या हस्ते बक्षीस वितरण

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | आषाढी एकादशी निमित्त आयोजित केलेल्या पंढरपूर वारी संदर्भातील चित्र रंगवा स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण आमदार किशोर पाटील यांचे हस्ते गौरविण्यात आले.

या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

स्पर्धेतील विजेते प्रथम – मयूर राजेंद्र मिस्तरी, द्वितीय – भूमी मनोज पाटील, तृतीय – प्रथमेश दिलीप सोनवणे तर उत्तेजनार्थ – मनीषा सुरेश पाटील, प्राची जोशी, समृद्धी तुषार जळतकर, आराध्या गोकुळ पाटील, अंशुला सुशांत जाधव, राजलक्ष्मी पंकज जाधव, बक्षीस वितरण आमदार किशोर आप्पा पाटील व नगराध्यक्ष संजय गोहिल, यांचे शुभहस्ते पार पडले. या प्रसंगी शहरप्रमुख किशोर बारावकर, बंडूभाऊ चौधरी, संदीपराजे पाटील, प्रविण ब्राह्मणे, गजू पाटील, प्रविण पाटील, मोहित पाटील, बंडू सोनार, अनिल राजपूत, वैभव राजपूत, शैलेश कुलकर्णी, विशाल राजपूत, अश्विनी जळतकर, अमरदीप राजपूत आदी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.