चित्रा वाघ यांच्या ट्विटचा जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी केला निषेध

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  भाजप पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटर अकाउंटच्या माध्यमातून एक व्हिडिओ प्रसिद्ध करत  कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे चरित्र हनन केल्याने  जळगाव जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी चित्रा वाघ यांचा तीव्र शब्दात निषेध केला.

 

भाजपच्या  नेत्या चित्रा वाघ यांनी  ट्विटर अकाउंटच्या माध्यमातून एक व्हिडिओप्रसिद्ध करत त्या व्हिडिओमध्ये एका जोडप्याचा पाठीमागून फोटो काढून त्यामधील व्यक्ती ही प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले असल्याचा आरोप करून त्यांच्या चारित्र्यावर चिखलफेक केल्याने जळगाव जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी चित्रा वाघ यांचा निषेध व्यक्त केला आहे.

चित्रा वाघ यांना जर खरंच महिलांची  चिंता असती तर महाराष्ट्र राज्यामध्ये मागील दोन प्रकरणांमध्ये त्या का गप्प होत्या..? असा प्रश्न जिल्हाध्यक्ष श्री. मराठे यांनी विचारला. पहिलं प्रकरण म्हणजेच भाजपाचे आमदार गणेश नाईक यांच्यावर एका महिलेने केलेले गंभीर आरोप या प्रकरणाच्या बाबतीत देखील चित्राताई वाघ आपण  का  गप्प होत्या..? तसेच दुसरे प्रकरण म्हणजे  नुकतेच घडलेले भाजप पक्षाचे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी एका महिलेला फसविले व त्या पीडित महिलेने एक व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध केला व त्या प्रकरणात देखील चित्रा वाघ आपण  गप्प का होत्या  ?  भाजप पदाधिकाऱ्यांनी अत्याचार केलेल्या महिलांबद्दल चित्रा वाघ का  बोलत नाही..? किंवा भाजप पक्षाने त्यांना आपल्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात बोलण्याचे अधिकार दिले नाहीत का..? यामधूनच याचा असा अर्थ निघतो असे  स्पष्ट केले आहे.

भाजप पक्षाने आता सध्या संपूर्ण  देशांमध्ये अतिशय खालच्या दर्जाचे राजकारण सुरू केलेला आहे. जो आपल्या विरोधामध्ये बोलेल त्याच्या मागे एक तरी ईडी लावायची आणि ईडी मध्ये सापडेल असं जर त्याचं काही नसेल तर मग त्याच्या चारित्र्यावरच हल्ला करून त्याला राजकीय जीवनामधून नास्तनाभूत करायचं काम भाजप पक्षाने विरोधकांसाठी सुरू केलेला दिसत आहे .  त्याच माध्यमातून चित्रा वाघ यांना आपल्या भाजपच्या भाऊबंधांकडून  नानाभाऊ पटोले यांना देखील बदनाम करण्याची सुपारी मिळालेले दिसते आहे

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.