चिंताजनक : भुसावळमधील कोरोनाचा संशयित रुग्ण व्हेंटीलेटरवर !

जळगाव (प्रतिनिधी) कोरोना या व्हायरसची दहशत संपूर्ण देशासह राज्यात पसरलेली आहे. जळगाव जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात आज नव्याने ४ रुग्ण कोरोना संशयित म्हणून दाखल झाले आहे. यातील एक रुग्ण बेशुद्ध अवस्थेत व्हेंटीलेटरवर असल्यामुळे एकच खळबळ उडालीय.

store advt

 

संशयित कोरोना रुग्ण आयसोलेशन वार्डात दाखल होताच रुग्णाच्या घशातील श्वासाचे नमुने घेण्यात आले. हे नमुने तपासणीसाठी तत्काळ पुण्याला पाठविण्यात आले आहेत. नमुन्यांचा तपासणी अहवाल उद्या मिळणार आहे. भुसावळ येथील २९ वर्षीय डॉक्टर कोल्हापूर येथून आला होता. गेल्या ५ दिवसांपासून श्वास घेण्याचा त्रास होत होता. आज ते जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांना बेशुद्धावस्थेत वेंटिलेटरवर ठेवण्यात आले आले आहे. तर दुसरे रुग्ण पती-पत्नी असून भूतान आणि इंडोनेशिया येथून चार दिवसांपूर्वी परतले आहेत. त्यांना सर्दी व खोकला जाणवत असल्याने दोघे जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले आहे. तर चौथा व्यक्ती दुबई येथे गेले होते. ते देखील आज संशयित म्हणून जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले आहेत. जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात आतापर्यंत १३ रुग्ण दाखल झाले असून त्यापैकी ४ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. उर्वरित ९ जणांचे रिपोर्ट उद्या सायंकाळपर्यंत मिळणार असल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन श्री. खैरे यांनी दिली आहे.

error: Content is protected !!