चिंताजनक : धरणगाव तालुक्यात आज १५ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह !

शेअर करा !

 

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव कोवीड केअर सेंटरला आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार तालुक्यात १५ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यात धरणगाव शहर ७, वराड-२, साळवा-२, कल्याणे खुर्द-१, उखळवाडी-२ तर पथराड येथील एका रुग्णांचा समावेश आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दुजोरा दिला आहे.

 

 

धरणगाव कोवीड केअर सेंटरला आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार तालुक्यात १५ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यात धरणगाव शहरातील जैन गल्ली-१, लांडगे गल्ली-१ तर वाणी गल्लीत ५ रुग्ण सापडले आहेत. तसेच वराड-२, साळवा-२, कल्याणे खुर्द-१, उखळवाडी-२ तर पथराड येथील एका रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यातील एकुण रूग्ण संख्या आता ३०० वर पोहचली आहे. तसेच आतापर्यंत १८७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर २१ जण मयत झाले आहेत. दुसरीकडे बालकवी ठोंबरे विद्यालय, कोविड सेंटर आणि लिटील ब्लाझम स्कूलमध्ये संशयिताना क्वारंटाईन करण्यात आलेले आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!