चिंचपुरा येथे शेतकरी संवेदना अभियान’ अंतर्गत मार्गदर्शन

धरणगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील चिंचपूरा येथे ‘शेतकरी संवेदना अभियान’ अंतर्गत शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘शेतकरी संवेदना अभियाना’चा एक भाग म्हणून तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्या अध्यक्षतेखाली चिंचपूरा येथे कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी शेतकऱ्यांना शासकीय योजना बद्दल माहिती देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच निराधार महिलांना जिवनावश्यक किट, गरजूंना शिधापत्रिका वाटप करण्यात आले. प्रास्तविक कैलास पाटील यांनी तर राजेंद्र सर यांनी आभार मानले. याप्रसंगीं मंडळ अधिकारी सुरेश बोरसे , तलाठी राहुल ढेरंगे, सरपंच ,कैलास पाटील. उपसरपंच ग्रा. स.महिला मंळल. व ग्रामस्थ उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: