चाळीसगाव, प्रतिनिधी | शहरातील एका भागात राहणाऱ्या दोन तरूणी बेपत्ता झाल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी पोलिसात हरविल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या १९ वर्षीय दोन तरूणी १२ जानेवारी रोजी सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास घरात कोणालाही काही एक न सांगता निघून गेल्या. मात्र आजपावेतो त्या घरी परतल्या नाही. त्यावर घरच्यांनी परिसरासह नातेवाईकांकडे आजपर्यंत शोधाशोध केली असता त्या मिळून आल्या नाहीत. म्हणून हरविल्याची खात्री झाल्यावर घरच्यांनी चाळीसगाव शहर पोलिस स्थानक गाठून हरविल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोहेकॉ अजय मालचे हे करीत आहेत.