चाळीसगाव शहरातून गायी चोरीला; गुन्हा दाखल

चाळीसगाव, प्रतिनिधी | शहरातील हनुमानवाडी येथे घराजवळच्या शेडमध्ये बांधलेल्या २० हजार रुपये किंमतीची जर्शी गाय अज्ञाताने लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, शहरातील हनुमानवाडी येथील अर्जून निंबा गवळी (वय-४९) यांनी घराजवळच्या शेडमध्ये बांधलेली २०,००० हजार रुपये किंमतीची काळ्या रंगाची जर्शी वानीची गाय अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे घटना उघडकीला आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हि घटना १७ नोव्हेंबर रोजी रात्री ९ ते १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ६:३० वाजता या दरम्यान घडली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अर्जून निंबा गवळी यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात भादवी कलम-३७९ प्रमाणे अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक के के पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास किशोर सोनवणे हे करीत आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!