चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या दोन ते तीन दिवसांपासून चाळीसगाव तालुक्यात चोरीचे प्रमाणात अधिक वाढ झाली आहे. चोरट्यांना पोलीसांचा धाक संपला की काय असा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. चोरी करून चोरटे एका प्रकार पोलीसांना दुरूनच सलामी देत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. कारण चिरीमीरी कारवाईकडे पोलीस व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा येथील शेतकऱ्याच्या घराचा कडी कोयंडा तोडून घरात घुसून अज्ञात चोरट्यांनी १ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत जळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा येथील राहणारे शेतकरी दिलीप निंबा पाटील हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. १६ मे रोजी रात्री ८ वाजता नेहमीप्रमाणे ते जेवण करून परिवारासह झोपले. मध्यरात्री अज्ञात चोरट्याने त्यांचे घराचे दरवाजाचे कडी कोयंडा तोडून हात प्रवेश करत लोखंडे कपाटामध्ये ठेवलेले दागिने रोख रक्कम असा एकूण १ लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना घडल्यानंतर दिलीप पाटील यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार अभ्यास नोटांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय महाजन करीत आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.