चाळीसगावात संत गाडगे महाराज प्रबोधन परिषदेची कार्यकारिणी जाहीर

चाळीसगाव, प्रतिनिधी | मराठा सेवा संघ प्रणित संत गाडगे महाराज प्रबोधन परिषदेची तालुका कार्यकारिणी जाहीर झाली आहे. यात पदाधिकाऱ्यांवर पदभार सोपवून पदग्रहण कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत गाडगे महाराज प्रबोधन परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष प्रा. वैशाली पाटील, प्रदेश कार्याध्यक्षा यामिनी ताई खैरनार, धुळे जिल्हाध्यक्ष शारदा पाटील, तालुकाध्यक्ष अर्चना पाटील, कोषाध्यक्ष आशा पाटील, जळगाव जिल्हाध्यक्ष वैशाली शेवाळे आदी उपस्थित होते. मान्यवरांनी जिजाऊ वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. व आलेल्या सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार चाळीसगाव तालुक्यातील नवनिर्वाचित कार्यकारणीच्या सभासदांनी केली.

नवनिर्वाचित कार्यकारिणीत चाळीसगाव तालुकाध्यक्षपदी सविताताई जाधव, तालुका कार्याध्यक्ष जयश्री अहिरे, सचिव सोनालीताई मोरकर, कोषाध्यक्ष ज्योतीताई पाटील, प्रवक्ता ललिता ताई पाटील, संघटक मनिषा जाधव व ग्राम संघटक पदी रमेश पोतदार आदींचा समावेश आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.