चाळीसगावात मोबाईल चोरटा मुद्देमालासह ताब्यात

चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | चोरीचा मोबाईल विक्री करण्यासाठी शहरातील दर्गा परिसरात आलेल्या एका इसमाला शहर पोलीसांनी सापळा रचून ताब्यात घेतले असून त्याच्याजवळून चाळीस हजार रुपये किमतीच्या पाच मोबाईल हस्तगत केले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील दर्गा परिसरात चोरीचा मोबाईल विक्रीसाठी येत असल्याची गुप्त माहिती चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. त्यावर शहर पोलीसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. व अगझडतीतून ४० हजार रुपये किमतीच्या पाच मोबाईलसह त्याला ताब्यात घेतले आहे. तत्पूर्वी सदर इसमाचे नाव विचारले असता कुणाल कुंदन पवार रा. वाघळी ता. चाळीसगाव असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम-१२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि सुहास आव्हाड, पोना महेंद्र पाटील, राहुल सोनवणे, निलेश पाटील, नरेंद्र चौधरी, विनोद खैरनार, निलेश पाटील, भूषण पाटील, ज्ञानेश्वर गीते आदींनी केली असून पुढील तपास पोलीस अंमलदार महेंद्र पाटील हे करीत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content