चाळीसगाव, प्रतिनिधी । कोरोनाच्या काळात रक्ताच्या अभावामुळे अनेक रूग्णांची गैरसोय होत आहे. हि गैरसोय टाळण्यासाठी महाराणा प्रताप यांच्या ४८१ व्या जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन राजपूत मंगल कार्यालयात आज करण्यात आले.
कोरोनाने संपूर्ण जगाला हतबल करून ठेवले आहे. त्यात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात होत असल्याने अनेक रूग्णांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. आज हिंदुसूर्य मेवाड नरेश महाराणा प्रतापसिंह यांची ४८१ वी जयंती आहे. या दिवसाचे औचित्य साधून शहरातील राजपूत मंगल कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरात एकूण ६० जणांनी रक्तदान केले. तत्पूर्वी सकाळी ९ वाजता जय बजरंग व्यायाम शाळा येथे माजी उपनगराध्यक्ष शिवाजी देवसिंग राजपूत यांचे हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. राजपूत मंगल कार्यालय येथे आयोजित रक्तदान शिबिरात आ. मंगेश चव्हाण यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी रक्तदान शिबिराचे उद्घाटन चंपाबाई मंत्री हायस्कूलचे चेअरमन डॉ. सुनील राजपूत व माजी जि. प. सदस्य मंगेश पाटील यांचे हस्ते झाले. दिव्येश जयदीपसिंह गांगुर्डे या बालकाने उत्कृष्ट अशी तलवारबाजी सादर केली. याप्रसंगी पंचायत समिती गटनेते संजय भास्करराव पाटील, नगरसेवक संजय रतनसिंग पाटील, रामचंद्र जाधव, महेंद्र चंद्रसिंग पाटील, नगरसेवक दीपक पाटील, नानाभाऊ पवार, भाऊसाहेब जगताप, नितीन पाटील कुंझरकर, सविता सत्यवान जाधव, सुचित्रा राजेंद्र पाटील, माजी नगरसेवक निलेश मानसिंग राजपूत, प्रदीप पप्पू दिलीप राजपूत, दीपक परदेशी जामडी, पत्रकार सुनील राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर कार्यक्रमासाठी ठाणसिंग चिंधा पाटील व अरुणसिंग सुभाषसिंग पाटील यांनी राजपूत मंगल कार्यालयाचा हॉल उपलब्ध करून दिला. तसेच कार्यालय प्रमुख प्रवीण ठोके यांचे सहकार्य लाभले. तर जीवन सुरभी ब्लड बँकेचे डॉ. दत्ता भदाणे व त्यांची टीम यांनी सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी व आयोजन राष्ट्रीय राजपूत करणी सेना, शहर कार्यकारणी राष्ट्रीय युवक करणी सेना, महाराणा प्रताप मित्रमंडळ पाटीलवाडा, महाराणा प्रताप मित्रमंडळ जुने विमानतळ, महाराणा प्रताप मित्रमंडळ आदर्शनगर, राहुल पॉइंट जिद्दी ग्रुप, वैष्णव मित्रमंडळ, सिद्धिविनायक मंडळ यांनी केले.