चाळीसगावात “खोट्या प्रतिष्ठेच्या बळी’ विषयावर व्याख्यान उत्साहात

चाळीसगाव, प्रतिनिधी | चाळीसगावात साऊ व जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त महिला सहभाग अभियान स्त्री-पुरुष समानतेचा विचार सप्ताहाच्या निमित्ताने “खोट्या प्रतिष्ठेच्या बळी’ विषयावर व्याख्यान उत्साहात पार पडला. यावेळी पार लिंगी सामाजिक कार्यकर्ता शमिभा पाटील ह्या प्रमुख वक्त्या होत्या.

चाळीसगावात महाराष्ट्र अंनिस शाखा व दृष्टी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व साऊ आणि जिजाऊ संयुक्त जयंती उत्सवानिमित्त महिला सहभाग अभियान स्त्री-पुरुष समानतेचा विचार सप्ताहाच्या निमित्ताने “खोट्या प्रतिष्ठेच्या बळी’ या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन ८ जानेवारी रोजी करण्यात आले. यावेळी सदर विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी पार लिंगी सामाजिक कार्यकर्ता शमिभा पाटील ह्या प्रमुख वक्त्या उपस्थित होत्या. दरम्यान विवेक आधारित मानवतावादी माणूस व समाज मनाची जडणघडण होणे गरजेचे आहे. त्यासाठी युवा युवतींनी आपली समज वाढवणे व बदल घडविणे अपेक्षित असल्याचे प्रतिपादन शमिभा पाटील केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक नीता सामंत यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी बदल होण्यासाठी समज व संघर्ष गरजेचा आहे. विवेकावर आधारित असावा ,समाज बदल घडावा यासाठीच अशा कार्यक्रमाचे आयोजन अंनिस नेहमी करत असल्याचे सांगितले.

भारतीय समाज व्यवस्थेमध्ये असलेले जातीय उतरंड व त्यात होणारे मानवी नैसर्गिक भावनांचे दमन-हनन आणि पितृसत्ताक समाजव्यवस्थेत केलेले वर्ग-वर्ण लिंग यांचे वर्गीकरण याचा आधार घेत सहजपणे मानवी भावनांचा अनादर केला जातो. व त्याला प्रतिष्ठेचे कळप चढवून खोट्या इभ्रत अब्रू पाई माणूस मारून टाकण्या पर्यंत मजल जाते. बेगडी खोट्या प्रतीष्ठेपायी माणूस मारणे उदा. वैजापूर येथील घटना असो हैदराबाद मधील हत्या असो .स्त्रीभ्रूणहत्या ते जात पंचायत इथपर्यंत हे सगळे अप्रत्यक्ष खोट्या प्रतिष्ठेसाठी पितृसत्ताक धर्मांध व्यवस्थेचे संवाहक गुलाम मेंदूच्या स्त्री-पुरुषांच्या वतीने होणाऱ्या दुर्दैवी घटना आहेत.

यावेळी अंनिसच्या तालुका कार्याध्यक्ष प्रा. किरण पाटील यांनी अंनिसची चळवळ केवळ धर्माविरोधी असल्याचे सांगून नकारात्मक बाजू मांडली जाते. परंतु अंनिस ला विज्ञान विवेकाधारित माणूस समाज घडवायचा आहे. त्यासाठी अंनिस राज्यभरात असे उपक्रम राबवित असते. असे ते म्हणाले. डॉ. पायल पवार मानसोपचार तज्ञ यांनी उपस्थित युवा युवतींना मानसशास्त्राच्या साह्याने अंधश्रद्धा निर्मूलन व सामाज बदल-व्यक्ती विकास होणे गरजेचे आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीभा पाटील यांनी तर आभार प्रदर्शन सागर नागणे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वैशालीताई निकम, प्रा. विजया चव्हाण ,मीनाक्षी देशमुख ,प्रा. वामन पाटील ,मंदाताई कांबळे, विजया ठाकुर,सपना मोरे ,रेखा पाईकराव, आशाताई चव्हाण , राजश्री पगारे ,संघमित्रा त्रिभुवन, प्रियंका चव्हाण आदींनी परिश्रम घेतले. तर यावेळी युवक- युवतीसह परिसरातील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content