चाळीसगावला शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी दिलीप घोरपडे

चाळीसगाव प्रतिनिधी । शिवसेनेतर्फे शिवजयंती उत्सव समिती नियोजनासाठी घाटरोड येथील शिवसेना कार्यालयात शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यात शिवसेनेच्या शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी दिलीप घोरपडे तर उपाध्यक्ष पदी सुनील गायकवाड व अनिल पाटील, सचिवपदी दिनेश विसपुते यांची निवड करण्यात आली.

या समितीत सदस्य म्हणून रामेश्‍वर चौधरी, रवींद्र चौधरी, नकुल पाटील, मनोज कुमावत, नाना पाटील, तुकाराम पाटील, वासुदेव पाटील, सागर पाटील, सुभाष राठोड, आप्पा देवरे, सचिन भोईर, मोतीलाल चौधरी, संजय पाटील यांचा समावेश आहे. यावेळी नव नियुक्त उत्सव समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व सदस्यांचे ज्येष्ठ नेते तुकाराम कोळी, गोपाल दायमा, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील, जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील, शिवसेना तालुका प्रमुख रमेश चव्हाण, तालुका विधानसभा क्षेत्र प्रमुख भिमराव खलाने, माजी नगरसेवक नंदकिशोर बाविस्कर आदी ज्येष्ठ पदाधिकार्‍यांनी अभिनंदन केले.

यावेळी मानाची कुस्ती जिंकून गदा व रोख सात हजार रुपयांचे बक्षीस पटकावलेल्या दिनेश सुभाष गायकवाड या पैलवानाचे देखील शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे तुकाराम पाटील, जगदीश महाजन, अण्णा पाटील, शैलेंद्र सातपुते, गोपाल परदेशी, दिनेश घोरपडे, सचिन गुंजाळ, नाना शिंदे, सचिन ठाकरे, युवराज कुमावत, नाना पाटील, राजेंद्र कुमावत, रघुनाथ कोळी, वासुदेव पाटील, चेतन भोई, दिनेश गायकवाड, पांडुरंग बोराडे, प्रभाकर उगले, अनिल कुडे ,बापू लेनेकर, अनिल कुर्‍हाडे आदी उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!