चाळीसगावच्या मुख्याधिकारीपदी प्रशांत ठोंबरे

चाळीसगाव प्रतिनिधी | येथील नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी नाशिक महापालिकेतील उपायुक्त प्रशांत ठोंबरे यांची नियुक्ती करण्यात आली असून याचे प्रशासकीय निर्देश जारी करण्यात आले आहेत.

 

चाळीसगाव येथील नगरपालिकेत कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्यामुळे विकासकामांना मोठ्या प्रमाणात अडसर निर्माण होत आहे. मध्यंतरी काही वेळेस प्रभारी तर काही वेळेस कायमस्वरूपी मुख्याधिकार्‍यांची नियुक्ती झाली तरी त्यांची तातडीने बदली करण्यात आली. यामुळे शहरातील अनेक विकासकामे खोळंबून राहिल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.

या पार्श्‍वभूमिवर, नाशिक महापालिकेत उपायुक्त म्हणून कार्यरत असणारे प्रशांत ठोंबरे यांची चाळीसगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नगरविकास खात्याने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. यामुळे आता तरी चाळीसगावच्या विकासाला गती येण्याची आशा निर्माण झाली आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!