चार आर्यसत्य जीवन जगण्याचे सार्थ आहे, तृष्णा हे दुःखाचे कारण आहे – प्रा.डॉ.सत्यजित साळवे

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  लोभ, द्वेष आणि भ्रम नष्ट करणे हा मुख्य उद्देश आहे. जेव्हा तहान आणि उत्कट इच्छा जागृत होऊन निर्वाणाकडे नेले जाते, तेव्हा शाश्वत आनंदाची प्राप्ती होते. लोभ, द्वेष आणि भ्रम कमी करण्यासाठी माणसाने धम्म जाणला पाहिजे आणि नंतर त्याने चांगले आचरण आणले पाहिजे. अष्टमार्गाचा अवलंब केल्याने तृष्णा कमी होते आणि मनुष्याला दुःखापासून मुक्ती मिळते. परंतु बुद्ध धम्म सांगतो तृष्णा हे दुःखाचे कारण आहे, असे साहित्यिक प्रा.डॉ.सत्यजित साळवे यांनी व्यक्त केले.

 

अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठान व शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आनंदयात्री अण्णासाहेब डॉ.जी.डी.बेंडाळे पुण्यतिथी व बुद्धपौर्णिमा निम्मित  भगवान बुद्धाचा उपदेश या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. केतन चौधरी सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर प्रा.स्वाती चव्हान उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अशोक राणे यांनी सांगितले कि अष्टांगिक मार्ग हा गौतम बुद्धांनी सांगितलेला काम, क्रोध, द्वेष, इ. दोष दूर करून जीवन निर्मळ करण्याचा सदाचाराचा मार्ग आहे. अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे शल्यचीकित्सक होते त्यांनी आयुष्याचे ६० वर्ष सेवा दिली आणि बुद्ध मनाचे चिकित्सा करणारे विशारद होते असे त्यांनी सांगितले.  पुढे बोलतांना प्रा.साळवे म्हणाले कि, बुद्धांनी आपल्या पहिल्याच उपदेशामध्ये मानवी समाजात असलेल्या विषमतेचे वर्णन करताना सांगितले, की मनुष्यप्राणी दुःखात, दैन्यात आणि दारिद्र्यात राहत आहे. याचाच अर्थ दुःख आणि दारिद्य्र ही व्यक्तीला आणि परिणामी समाजाला अधोगतीकडे नेणारे मार्ग आहेत. यावेळी प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.स्वाती चव्हाण व  आभार के.सी.ई सोसायटीचे जनसंपर्क अधिकारी प्रा. संदीप केदार यांनी मानले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content