चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक : ३ जण ठार

पहूर ता. जामनेर प्रतिनिधी।  पहूर येथून जवळच असलेल्या पाळधी तालुका जामनेर येथे  गावाजवळील बळीराजा हॉटेल जवळ भीषण अपघात झाला असून या अपघातात तिघे ठार झाले आहेत.

 

भराडी येथील चारचाकी वाहक प्रविण प्रकाश पाटील (वय ३८)   तर जळगाव येथील दुचाकी वरील पंकज मोहन तायडे (वय ३२ रा. कला वसंत नगर, असोदा रेल्वेगेट) तर दुसरा व्यक्ती धनंजय गंगाराम सपकाळे (वय ४२ रा. स्टेट बँक कॉलनी जळगाव) या  व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. फॉरचून फायनान्स बँकेचे शाखा व्यवस्थापक धनंजय सपकाळे व सेल्स एक्झिक्युटिव्ह पंकज तायडे हे शेंदुर्णी येथून एम. एच. १९  डी. आर. १४१९  या युनिकॉर्न दुचाकी वाहनाने बँकेचे कामकाज आटोपून जळगाव जात असताना पाळधी येथील बळीराजा हॉटेलजवळ जळगाव कडून येणारी चारचाकी एमएच १०  सीयू ७१६१  या वाहनाने दुचाकीला दिलेल्या  जोरदार  धडक दिली. हा अपघातात एवढा भीषण होता की दुचाकीस्वारासह मागे बसलेल्या व्यक्तीचे हात, पाय हे शरीरापासून वेगळे तुकडे होऊन रस्त्यावर विखुरलेले होते. या  अपघाताची माहिती मिळताच पहूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल नाईक यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पी. एस.आय.अमोल देवडे तपास करीत आहे.

Protected Content