चारचाकीची चोरी करणाऱ्या संशयिताला एमआयडीसी पोलिसांकडून अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी ।तालुक्यातील उमाळा येथून बोलेरो ही चारचाकी चोरी करणाऱ्या संशयिताला एमआयडीसी पोलिसांनी मंगळवार, १६ मे रोजी नशीराबाद गावातून अटक केली आहे.  सलीम शेख कलीम वय 28 वर्षे रा. नशिराबाद असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.

 

उमाळा येथील रहिवासी शंकर प्रभाकर पाटील यांचे एमएच 19 एस 6241 या क्रमांकांचे बोलेरो पिकअप चोरीस गेल्याची घटना १३ ऑक्टोंबर २०२२ रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास घडली होती.  याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासात चारचाकीची चोरी ही नशीराबाद येथील सलीम शेख कलीम याने केल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरिक्षक जयपाल हिरे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, मुदस्सर काझी, ईम्रान सैय्यद, छगन तायडे, साईनाथ मुंढे, राहुल रगडे यांच्या पथकाने मंगळवारी नशीराबाद येथून संशयित सलीम शेख यास अटक केली, त्याला जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संशयित सलीम शेख याच्यावर यापूर्वीही वाहन चोरीचे दोन गुन्हे दाखल असून त्याच्याकडून आणखी अशाप्रकारे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content