चाकूचा धाक दाखून तरूणाला लुटणाऱ्या तिघांना अटक

अमळनेर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील गांधलीपुरा भागात एकाला चाकूचा दाखवून खिशातील रोकड व पाकीट असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत शनिवारी ११ मार्च रोजी मध्यरात्री ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.

अमळनेर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जुबेर खान युसुफ खान (वय-३०, रा. गलवाडे रोड, अमळनेर) हा तरुण शुक्रवारी १० मार्च रोजी रात्री ९ वाजता अमळनेर शहरातील गांधीपुरा भागात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ उभा होता. त्यावेळी काजल उर्फ रफिक शेख रशीद, शाहरुख अली अख्तर आली पठाण आणि अरबाज उर्फ काल्या अली अख्तर अली पठाण तिघे रा. गांधीपुरा यांनी जुबेर खान याला पोटावर चाकू लावून खिशातील रोकड काढण्यास सांगितले. त्यानंतर पैसे दिले नाही म्हणून एकाने चाकूने वार करून पायाला दुखापत केली. तसेच गळ्याला चाकू लावून त्याच्या खिशातील ३ हजार ६०० रुपयांची रोकड आणि पाकीट जबरी हिसकावून लांबविण्याची घटना घडली आहे. जखमीवस्थेत जुबेर खान याने अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन संशयित आरोपी यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेला तक्रारीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत तिघांना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे करीत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content