चाकूचा धाक दाखवून बकऱ्या चोरणाऱ्या तिघांना रंगेहात पकडले

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाकूचा धाक दाखवून बकरी चोरून नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला नागरीकांनी पकडून पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तीनही संशयित हे मध्यप्रदेशातील असून कारमधून बकऱ्या चोरी करण्याचे त्यांनी कबुल केले आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पोलीस नाईक रविंद्र पाटील हे बुधवारी ११ मे रोजी सकाळी ११ वाजता दुचाकीने पेट्रोलींग करत असतांना शहरातील गलवाडे रोडवर काही नागरीकांची गर्दी दिसून आली. त्याबाबत चौकशी केली असतान तीन संशयित आरोपी हे कारमधून बकऱ्या चोरून नेल्याचा प्रयत्न करत होते. हा प्रकार येथील स्थानिक नागरीकांच्या लक्षात आल्याने त्यांनी तीन संशयित आरोपींना पकडून ठेवले होते. दरम्यान यातील एकाने चाकूचा धाक दाखवत बकऱ्या चोरून पसार होण्याचा प्रयत्न करत असतांना नागरीकांनी त्याच्या हातातील चाकू हिसकावून पकडून ठेवले होते. दरम्यान, या चोरट्यांनी दोन दिवसांपुर्वी याच परिसरातून काही बकऱ्या चोरून नेल्या होत्या असे येथील नागरीकांनी सांगितले. दरम्यान त्यांचे नाव गाव विचारले असता मुस्तकीम अहेमद मझाहर कुरेशी (वय-३८), शाहिद खा शब्बीर खा पठाण (वय-४८) आणि गोवर्धन हुकूमसिंग लोधी (वय-४२) सर्व रा. मध्यप्रदेश अशी नावे आहे. तिघांना ताब्यात घेवून त्यांच्या जवळील स्विप्ट कार हस्तगत केली आहे. तर चोरलेल्या बकऱ्यांची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस नाईक अभिमन पाटील यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल हटकर करीत आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content