चांदसर शिवारातून एकाची दुचाकी लांबविली

धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील चांदसर येथून एकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवारी १५ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश नारायण भांडारकर (वय-५२) रा. चांदसर ता.धरणगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. १० नोव्हेंबर रोजी त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच १४ बीएल १३७८) चांदसर शिवारात लावलेली होती. अज्ञात चोरट्यांनी २५ किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे समोर आले. त्यांनी परिसरात सर्वत्र दुचाकीचा शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर मंगळवारी १५ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अरूण निकुंभ करीत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content