चांदसर येथे शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिर : महिलांनी केले स्वेच्छेने रक्तदान

शेअर करा !

 

चांदसर, प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९७ व्या जयंतीनिमित्त चांदसर गावात स्वराज्य ग्रुप, तसेच ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

शिवजयंतीनिमित्ताने आयोजित  रक्तदान शिबिरात मोठ्या प्रमाणात तरुणांनी सहभाग घेत, गावातील काही महिलांनीही स्वेच्छेने रक्तदान करत आपला सहभाग नोंदवला. यावेळी ५५ पिशव्या रक्तसंचलन झाले. जळगाव येथील रेड क्रॉस सोसायटीमार्फत रक्तसंचलन करण्यात आले.  सकाळी प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला सरपंच सचिन पवार यांनी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. तसेच त्यांनी मनोगत व्यक्त केले.  त्यांनी आगामी  काळात असेच उपक्रम राबवण्याचा मानस  यावेळी व्यक्त केला. रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले.  रेडक्रॉस सोसायटी  उज्वला वर्मा व्यवस्थापक इंडीयन रेडक्राॅस सोसायटी व डाॅ.अनिल भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. सुनिल पाटील सेफ्टी ऑफिसर रेमंड यांच विशेष सहकार्य ह्या कार्यक्रमाला लाभले.  पाळधी येथील एपीआय गणेश बुवा ह्यांनी ही शिबिरास भेट देऊन कार्यक्रमाचे कौतुक केले.

 

 

 

 

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!