घरेलू कामगार कॉंग्रेस पक्षाच्या प्रदेश महासचिवपदी प्रसन्न देशमुख यांची नियुक्ती

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज  प्रतिनिधी  | महाराष्ट्र प्रदेश घरेलु कामगार काँग्रेस पक्षाचे प्रदेश महासचिवपदी प्रसन्न गुणवंतराव देशमुख तर प्रदेश सचिवपदी अजय रामकृष्ण बढे यांची नियुक्ती करण्यात आली.  त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

 

यावल तालुक्यातील नायगाव  येथील  प्रसन्न  देशमुख तर प्रदेश सचिवपदी कोरपवाली येथील  अजय रामकृष्ण बढे यांची नियुक्ती करण्यात आली.  हि नियुक्ती  प्रदेशाध्यक्ष  नाना पटोले यांच्या  सूचनेवरून प्रदेश अध्यक्ष  सुशील शिंदे यांनी केली आहे. याप्रसंगी  मुंबई विधान परिषदचे आमदार  भाई जगताप व  सीताराम चव्हाण  यांच्या  माध्यमातून करण्यात आली.  यात प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष आमदार  शिरीष मधुकरराव चौधरी,  सेवा दल प्रदेश उपाध्यक्ष अजाबराव पाटील, जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष  प्रदीप  पवार , जिल्हा परिषदचे माजी गट नेता  प्रभाकर सोनावणे , गणेश भैय्या बारसे, यावल पंचायत समितीचे माजी गट नेते  शेखर सोपान पाटील , कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नितीन व्यंकट चौधरी, खरेदी विक्री सहकारी संघाचे चेअरमन अमोल भिरुड , काँग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष कदिर खान व राजू करांडे यांचे अनमोल सहकार्य लाभले. प्रसन्न देशमुख व अजय बढे यांच्या निवडीचे कॉंग्रेस तालुका कमेटीच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे .

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.