बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बोदवड तालुक्यातील भानखेडा येथील एका घराला रात्री अचानक लागलेल्या आगीत संसोपयोगी वस्तू जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे. या आगीत ७० हजार रूपये किंमतीचे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बोदवड तालुक्यातील भानखेडा येथे कुळाचे मातीचे घर रात्री अचानक जळाल्यामुळे घरातील जीवित हानी टळली मात्र घरातील दोन पोते गहू, ५० कोंबड्या, कपडे लत्ते घरातील भांडे असे एकूण ७० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे राजू किसन मोरे व शोभा राजू मोरे यांनी पंचनामा करीत असतांना तलाठी हेमंत महाजन यांना सांगितले आहे. रात्री ११ वाजता झोपेत असतांना एकूण २० जण त्या झोपडीत झोपलेले होते. सुदैवाने जीवित हानी टळली पंचनामा करीत असतांना सरपंच अनिल मोरे पोलीस पाटील व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती हजर होते.गरीब व्यक्ती असल्यामुळे शासनाने यांना त्वरित मदत करावी अशी मागणी घर जळालेल्या राजू मोरे यांनी केली आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.