घरातून तरूणीचा लॅपटॉप लांबविला

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील गणेशवाडी येथील एका घरातून तरूणीचा ३० हजार रूपये किंमतीचा लॅपटॉप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची माहिती अशी की, हर्षदा सुनील चिंचोले (वय-२५) रा. गणेशवाडी जळगाव ही तरूणी खासगी नोकरीला आहेत. त्यांच्याकडे ३० हजार रुपये किमतीचा एप्पल कंपनीचा लॅपटॉप आहे. गुरूवार १२ मे रोजी सकाळी ८ ते ८.३० या दरम्यान त्यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने ३० हजार रुपये किमतीचा मिनी लॅपटॉप चोरून नेला. त्यांनी घरातील परिसरात शोधाशोध केले परंतु लॅपटॉप कुठेही मिळाला नाही. अखेर हर्षदा चिंचोले यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुरुवार १२ मे रोजी सायंकाळी ७ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील सोनार करीत आहे.02:46 PM

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!