घरफोडीच्या गुन्ह्यातील भुसावळचा आरोपी जळगाव पोलिसांच्या ताब्यात

भुसावळ :  प्रतिनिधी  । घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी भुसावळात आला असता त्यास बाजारपेठ  पोलीस स्टेशनच्या पथकाने शिताफीने पकडून जळगाव एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले. 

 

आज सकाळी घरफोडी गुन्ह्यातील जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला हवा असलेला संशयित आरोपी  गोविंदा  बाविस्कर (रा.श्रीरामनगर) हा भुसावळ शहरात आला होता. याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळाली त्यांनी त्याला  श्रीरामनगर भागातून ताब्यात घेतले. गोविंदा बाविस्कर यास पकडून जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमधील  सहा.फौ.आनंदसिंग पाटील व पो.हे.काॅ.गफ्फार तडवी  त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.  ही   कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी  सोनामथ वाघचौरे व पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.रविद्र बिऱ्हाडे , रमण सुरळकर, उमाकांत पाटील,पो. का. विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी यांच्या पथकाने केली.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.