ग्रामोद्योग संस्थाच्या चेअरमनपदी पिंटू महाजन व्हाईस चेअरमन पदी ज्योती शिरतुरे निवड

रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील महत्वाची असलेली बहुउद्देशीय विविध कार्यकारी सहकारी संस्थाच्या चेअरमनपदी पिंटू महाजन तर व्हाईस चेअरमनपदी ज्योती शिरतुरे यांची एकमताने निवड करण्यात आली.

 

सोसायटीच्या कार्यालयात संचालक मंडळाची झालेल्या बैठकीत मुरलीधर महाजन उर्फ पिंटू महाजन यांची चेअरमनपदी तर ज्योती शिरतुरे यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आय. बी. तडवी यांनी काम पाहिले. त्यांना सचिव जे. एस चौधरी यांनी सहकार्य केले. यावेळी संचालक बाळू शिरतुरे , प्रकाश पाटील, विश्वनाथ दहिभाते, गणेश पाटील, सिंधू शिलोंडे, विजय तायडे उपस्थित होते. चेअरमन व्हाईस चेअरमन निवडीबद्दल राष्ट्रवादी महिला जिल्हा उपध्यक्ष शकुंतला महाजन, राष्ट्रवादी किसान सभा जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, उद्योगपती अनिलशेठ अग्रवाल, डॉ. सुभाष पाटील, नारायण घोडके, भागवत चौधरी, भाऊराव पाटील, बबलूशेठ नगरिया , एल. डी. निकम, आर. डी. वाणी, रवी महाजन आदींनी अभिनंदन केले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!