ग्रामरोजगार सेवक संघटनेतर्फे गटविकास अधिकारी पाटील यांचा सत्कार

 

पारोळा, प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटनेकडुन पारोळा पंचायत समिती येथे नुकतेच हजर झालेले गटविकास अधिकारी एन. आर. पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन संघटनेमार्फत सत्कार करण्यात आला.

एन. आर. पाटील यांनी यापूर्वी बरेच वर्षे पारोळा तालुक्यात ग्रामसेवक म्हणुन उत्कृष्ट प्रकारे काम केलेले आहे, त्यांच्या कामाची सचोटी पाहून त्यांना शासनाकडून वेळोवेळी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांचे कार्य पाहून आज रोजी ते पंचायत समिती पारोळा येथे नुकतेच गटविकास अधिकारी म्हणुन रूजु झालेले आहेत. त्यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटनेकडून करण्यात आला. सत्कार करतांना संघटनेचे जिल्ह्याध्यक्ष सुरेश पाटोळे, तालुकाध्यक्ष शरद पाटील, उपतालुकाध्यक्ष प्रभाकर भोई, सचिन पाटील, जगदिश पाटील, संजु पाटील, प्रमोद ठाकरे, चंद्रकांत माळी आदि ग्रामरोजगार सेवक उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.