गौरी भदोरीया (ठाकुर) हिने लॉकडाऊन काळात साकारल्या विविध आकर्षक कलाकृती (व्हिडिओ)

शेअर करा !

खामगाव, प्रतिनिधी । स्थानिक समता कॉलनी भागातील रहिवासी गौरी भदोरीया (ठाकुर) या नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. त्या सेवाभावी संस्थेच्या युथ अध्यक्षा तसेच यु.जे सी चेअरमन आहेत. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी विविध आकर्षक कलाकृती साकारल्या आहेत.

store advt

गौरी भदौरिया हि विज्ञान शाखेत द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत असून त्यांना कलेचा छंद आहे. लॉकडाऊनदरम्यान मिळालेल्या संधीचा उपयोग करून त्यांनी आकर्षक वॉल पेंटिंग, सुंदर असे पलावर तसेच घर सुशोभिकरण कविता बैलगाडीसह विविध कलाकृतींची उत्कृष्टरित्या सजावट केली आहे. गौरी या विविध शैक्षणिक उपक्रमही राबवितात व गरीब तसेच गरजु विद्यार्थ्यांना शिक्षण देवून स्वत:च्या पायावर उभे करून स्वावलंबी बनवतात. त्यांच्या या सामाजिक कार्य कलाकृतींचे सर्वच स्तरावरूनकौतुक होत आहे. गौरी ही नगरपरिषद पाणी पुरवठा विभाग मधील सुपरवायझर सुरजसिंह भदोरिया (ठाकुर) यांची सुकन्या आहे.

 

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!