गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | गोदावरी फाउंडेशन संचालित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च एमबीए महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची एक दिवसीय प्रशासन प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

 

प्रशासन प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत आयोजित कार्यशाळेत हरिभाऊ जावळे इन्स्टिट्युट ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड केटरींग टेक्नोलॉजी महाविद्यालयाचे प्रा. पुनीत बेसोन हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. पुनीत बेसोन यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रा. पुनीत बेसोन यांनी \कामाच्या ठिकाणी व्यावसायिकता आणि नैतिकता’ या विषयावर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना व्यावसायिकता, शाब्दिक, गैर-मौखिक संप्रेषणवर विविध उदाहरणाद्वारे माहिती दिली. यात त्यांनी बोलताना आपली देहबोली कशी ठेवली पाहिजे, तसेच बोलताना आदर व नम्रता हवी आदी विषयांवर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी कर्मचाऱ्यांनी आपले प्रश्न विचारून त्याचे नीरासन करून घेतले. महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. दिपक दांडगे यांनी प्रास्ताविक केले. या कार्यशाळेस महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक मयुर पाटील, अकाऊंटंट गौरव पाटील, सागर चौधरी यांच्यासह सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा. आफ्रिन खान यांनी केले. मयुर पाटील यांनी आभार मानले.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.