गोदावरी फाऊंडेशनमध्ये श्रींची विधीवत स्थापना

जळगाव, प्रतिनिधी ।  ॐ नमस्ते गणपतये ॥ त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि ॥ त्वमेव केवलं कर्तासि ॥ त्वमेव केवलं धर्तासि ॥ त्वमेव केवलं हर्तासि ॥ त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि ॥ त्वं साक्षादात्मासि नित्यम् ॥ म्हणतं विधीवतपणे गोदावरी फाऊंडेशन येथे बुद्धीची देवता असलेल्या श्रींची स्थापना करत गणेशोत्सवास सुरुवात झाली.

 

कोविड नियमांचे पालन करत हा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार असून गणेशा ह्या जगावरील कोरोनासह महामारीचे संकट टळू दे.. अशी मनोकामना करण्यात आली.   गणपती बाप्पा मोरया चा गजर यावेळी करण्यात आला. गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात मोरया गणेश मंडळातर्फे शुक्रवार, १० सप्टेंबर रोजी श्रींची विधिवतपणे स्थापना करण्यात आली. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकी पाटील,  डीएम कार्डियोलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, अधिष्ठात डॉ.एन.एस.आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड आदिंच्या हस्ते श्रींची पूजा करण्यात आली. धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे यावेळी कोरोना नियमांचे पालन करुन सादरीकरण करण्यात येत आहे.

शैक्षणिक संस्थांमध्येही बाप्पाचे आगमन

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरेपी महाविद्यालयाचे प्रिंसीपल डॉ.जयवंत नागुलकर, रजिस्ट्रार राहूल गिरी, गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात प्रिंसीपल डॉ.मौसमी लेंढे, व्हा.प्रिंसीपल मेनका एस.पी.प्रशासन अधिकारी प्रविण कोल्हे, यांच्या उपस्थीतीत नर्सिंग सुपरीटेंडंट संकेत पाटील यांनी सपत्नीक विधीवत स्थापना केली. गोदावरी इन्स्टीटयुट ऑफ मॅनेजमेंट अँन्ड रिसर्च जळगावचे संचालक डॉ.प्रशांत वारके, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.एच.पाटील, डॉ उल्हास पाटील विज्ञान महाविद्यालय, डॉ उल्हास पाटील विधी महाविद्यालयाचो प्राचार्य डॉ.सतीश घाडगे, डॉ वर्षा पाटील इन्स्टीटयुट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीचे प्राचार्य उज्जवला मावळे, गोदावरी संगित महाविद्यालयाच्या प्राचार्य पद्मजा नेवे, डॉ उल्हास पाटील कृषि अभियांत्रिकी व तांत्रिकी, कृषि महाविद्यालय, अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉ पी आर सपकाळे, डॉ एस एम पाटील, डॉ. शैलेश तायडे, आदिंच्या हस्ते बाप्पाची पूजा करुन साध्या पद्धतीने गणेशोत्सवास सुरुवात झाली. गोदावरीच्या स्कुलमध्येही बाप्पा विधिवत विराजमान गोदावरी फॉउंडेशन संचलित गोदावरी इग्लिश मिडीयम स्कुल जळगाव येथे प्रिन्सीपल निलीमा चौधरी यांचेसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थीत होते. तर डॉ. उल्हास पाटील इग्लिश मिडीयम स्कुल सावदा येथे प्रिन्सीपल भारती महाजन यांंचे हस्ते स्थापना करण्यात आली. डॉ उल्हास पाटील इग्लिश मिडीयम सीबीएसई स्कुल भुसावळ येथे संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, प्रिन्सीपल अनघा पाटील यांचे हस्ते विधीवत श्री ची स्थापना करण्यात आली.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!