गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक क्रीडा सप्ताह उत्साहात

क्रिकेटमध्ये प्रथम वर्ष बीटेक संघाने तर फुटबॉल स्पर्धेत प्रथम वर्ष डिप्लोमा संघाने विजेतेपद पटकावले

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव येथे नुकताच वार्षिक क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या वार्षिक क्रीडा सप्ताहाचे उद्घाटनासाठी गोदावरी फाउंडेशनचे सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील, प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

 

वार्षिक क्रीडा सप्ताहाअंतर्गत डॉ. केतकी पाटील यांनी फुटबॉलला किक मारून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी दीपक झांबरे, ईश्वर जाधव, हेमंत इंगळे, डॉ. नितीन भोळे, डॉ. प्रमोद गोसावी, अतुल बर्‍हाटे, तुषार कोळी, डॉ. विजयकुमार वानखेडे, शफिक रहमान उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. आसिफ खान यांनी तर आभार प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी मानले.

मुलींच्या बॅडमिंटनमध्ये बिमला पोखरेल यांनी पटकाविले विजेतेपद
क्रिकेटमध्ये १०, फूटबॉल मध्ये ६ संघांनी आपला सहभाग नोंदविला होता. तसेच बॅडमिंटन मुलींमध्ये बिमला ददीराम पोखरेल यांनी विजेतेपद पटकावले. २०२१-२२ या वर्षाला प्रथम वर्षाचे खेळाडूंनी मैदान गाजवले. क्रीडा स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.आसिफ खान यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच खेळाडूंनी आपला मोलाचे सहकार्य केले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!