गोंधळात विशेष सभा तहकूब (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | भाजप गट नेत्यला बैठकीला बोलविले नसल्याचा आरोप करत भाजप सदस्यांनी सभा तहकूब करण्याची मागणी केली तर सदस्यांनी गोंधळ घातल्याने सभा तहकूब करण्यात आल्याची माहिती महापौर जयश्री सुनील महाजन यांनी दिली.

 

आज महापालिकेच्या विशेष सभेचे आयोजन महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात  आले होते. महापौरांनी भाजप सदस्यांना बैठकीला बोलविले नसल्याचा आरोप कैलास सोनवणे यांनी केला. महापालिकेत शिवसेनेचे विराज कावडीया यांच्या स्वीकृत सदस्य निवडीचा विषय घेण्यात आला असता भाजपा नगरसेवकांनी मतदानाचा आग्रह केल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी आमच्या गट नेत्यांना बोलविण्यात आले नसल्याचा सभा तहकूब करण्यात यावी अशी मागणी भाजपच्या नगरसेविका शुचिता हाडा यांनी केली. स्वीकृत सदस्य निवडीचा विषय अजेंडावर असल्याने  मातदान घ्यावेच लागले असे कैलास सोनवणे स्पष्ट केले. तर हा शिवसेनेचा सदस्यच स्वीकृत सदस्यपदी येणार असल्याने हा विषय मंजूर करण्यात यावा अशी भूमिका शिवसेनच्या नगरसेवकांनी घेतली. मात्र, आपला याला आक्षेप असल्याने मतदान घेण्यात यावे अशी भूमिका कैलास सोनवणे यांनी घेत सभा तहकूब करण्याची मागणी केली. यावेळी सभागृहात विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नितीन लढ्ढा, किशोर बाविस्कर, विष्णू भंगाळे, मनोज चौधरी, नवनाथ दारकुंड, गणेश सोनवणे, चेतन सनकत  आदी उपस्थित होते. यावेळी चेतन सनकत यांनी दिलीप पोकळे हेच आमचे गटनेते असल्याचे महापौरांच्या निदर्शनास आणून दिले.  बहुमत कोणाचे आहे हे आधी सिद्ध करा असे आवाहन भाजप गटनेते भगत बालाणी  यांनी करत  प्रत्येक विषयावर मतदान घेण्यात यावा अशी मागणी केली. कैलास सोनवणे यांनी महापौर हे चुकीच्या पद्धतीने कारभार चालवीत असल्याचा आरोप करत बहुमत आमच्या बाजूने असून मतदान घ्या असा आग्रह लावला होता.  यावेळी अश्विन सोनवणे, जितेंद्र मराठे, मुकुंदा सोनवणे आदी उपस्थित होते.

 

भाग १

भाग २

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!