गोंदेगाव येथे भैरवचंडी सेवेत ६३ सेवेकऱ्यांचा सहभाग

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  श्री. स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालविकास केंद्र (दिंडोरी प्रणित) या संस्थेचे संस्थापक परमपूज्य गुरुमाऊली यांच्या वाढदिवसानिमित्त गोंदेगाव ता. सोयगाव येथे भैरवचंडी सेवा घेण्यात आली. पाचोरा व गोंदेगाव पंचक्रोशीतील ६३ सेवेकऱ्यांनी या सेवेत सहभाग नोंदवला.

 

दिंडोरी प्रणित श्री. स्वामी समर्थ सेवा मार्गाचे संस्थापक, गुरुमाऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांचा दि. १८ मार्च रोजी वाढदिवस साजरा होत आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात व देशात वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून गोंदेगाव ता. सोयगाव येथील श्री. स्वामी समर्थ केंद्रात १४ मार्च रोजी कालाष्टमी निमित्ताने भैरवचंडी पाठ पठणाची सेवा घेण्यात आली. ६३ श्री. स्वामी समर्थ सेवेकरी बंधू – भगिनींनी याप्रसंगी आपली सेवा रुजू केली. प. पु. गुरूमाऊलींच्या व दादासाहेब यांच्या आर्शिवादाने गोंदेगाव स्वामी समर्थ केंद्र येथे अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्ताने घेण्यात आलेल्या या आध्यात्मिक सेवेत गोंदेगाव येथील स्थानिक शशिकांत गरुड, सेवेकरी आनंदा मोरे , सिमा मोरे, आशा सोनवणे, मनिषा पाखले, यामिनी महालपुरे, शारदा निकम, आशा पाटील, आकाश महालपुरे, मिरा निकम यांनी परिश्रम घेतले.

 

तसेच पाचोरा येथून सुभाष पाटील, बाळु चित्ते, वंदना चित्ते, हर्षल पाटील, वैशाली महाजन, सुनंदा वारूळे, शारदा पाटील, कविता पाटील,  प्रतिभा वाणी, रेखा पाटील, विकास पाटील (वडगाव), विश्वजित पाटील (शिंदाड), नानु पाटील (शिंदाड), अरूण शिंदे (निमखेडी) यांनी आपली ग्राम अभियानाची सेवा कार्यात आपले बहुमोल योगदान दिले. या अभिष्टचिंतन सोहळ्यातील विविध कार्यक्रमासाठी पाचोरा जणकल्याण, सिध्दमंगल पुजन टिम यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content