गॅस सिलिंडर दरवाढीचा राष्ट्रवादीतर्फे निषेध

जळगाव, प्रतिनिधी | केंद्राने केलेल्या गॅस सिलिंडरच्या केलेल्या भरमसाठ दरवाढीचा राष्ट्रवादी युवती काँग्रेस जळगाव जिल्हा व महानगर यांच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला.

 

 

आज केंद्र सरकारने गॅस सिलिंडरच्या केलेल्या भरमसाठ दरवाढीचा निषेध राष्ट्रवादी जिल्हा कार्यालयात नोंदविण्यात आला. सर्वसामान्यांचे जगणे सोपे करण्याची गरज असताना केंद्र सरकार मात्र सतत भाववाढ करून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरत आहे म्हणून आज पंतप्रधान मोदी यांच्या फोटोला ओवाळून प्रतिकात्मक भाऊबीज साजरी करून मोदीजीनी जनतेला गरजेच्या जीवनावश्यक वस्तू स्वस्त करून समस्त महिला भगिनींना भाऊबीजेची भेट द्यावी यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

 

यावेळी जळगाव महानगरचे अध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील,युवती महानगर अध्यक्ष आरोही नेवे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख दिव्या भोसले, कार्याध्यक्ष कोमल पाटील, युवती जिल्हा उपाध्यक्ष दीपिका भामरे, जिल्हा सरचिटणीस स्नेहल शिरसाठ, सुनील माळी आदी उपस्थित होते.

Protected Content