गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण : स्वतः दिली ट्विटद्वारे माहिती

शेअर करा !

नवी दिल्ली, वृत्तसेवा । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वत: ट्विट करत त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे. कोरोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने चाचणी केली असताना आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं अमित शाह यांनी सांगितलं. अमित शाह यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणार असल्याची माहिती दिली आहे.

अमित शाह यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “कोरोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने आपण चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती ठीक आहे, पण डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आपण रुग्णालयात दाखल होत आहोत”“माझी विनंती आहे की, गेल्या काही दिवसांमध्ये जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी स्वत:चं विलगीकरण करावं आणि आपली चाचणी करुन घ्यावी,” असंही अमित शाह यांनी ट्विटमध्ये सांगितलं आहे.

store advt
आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!