चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यात मालपूरकडून चोपडा शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावरून गुरे वाहून नेणारे वाहनावर चोपडा पोलीसांनी कारवाई करत गायी व वासरू यांची मुक्तता केली आहे. याप्रकरणी चोपडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, शनिवारी २० मे रोजी मध्यरात्री वाहन क्र. एम. एच. १८.ए ए ६९८९ पांढऱ्या रंगाची महिंद्रा कंपनीची पिकअप बोलेरोवरील वाहन चालक यांनी त्याचे ताब्यातील वाहनात ३ गुरे, एक वासरु अंदाजे किंमत ३५ हजार हे दाटीवाटीने त्यांना वेदना होतील अशा रितीने जखडून बांधून नेत होता. विनापरवाना अवैधरित्या गुरांची वाहतूक करतांना मिळून आले आहे. वाहन चालक यांचेकडे वाहन चालवण्याचा कोणताही परवाना नव्हता. या घटनेबाबत पोहेकॉ लक्ष्मण शिंगणे यांचे फिर्यादीवरून शत्रुघ्न नामदेवराव पाटील (वय ३६, बोरअजंटी ता. चोपडा) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सफौ किशोर शालीग्राम शिंदे करीत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.